Posts

मौजा वडेगांव ( साकोली) येथे १४८ व्या जयंतीनिमीत्य बिरसा मुंडा चे बिरसा फायठर्सतर्फे अभिवादन वसमाजप्रबोधन

Image
साकोली १५ नोंहेबर - वडेगांव येथे १४८व्या धरती आबा महामानव भगवान बिरसा मुंडा जयंतीचे अौचित्य साधून राणी दुर्गावती व बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकॄती पुतळ्याचे विधिवत पूजन केले त्या वेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजा रोहन करण्यात आले उपस्थीत वामनजी वाडवे,दुर्योधन वरखडे,मानिकजी टेकाम,लता टेकाम,देवराम टेकाम, पुंडलिक पुसाम,बाळकॄष्ण पुसाम.महादेव पुसाम बिरसा फायटर्सरष मंडळाचे अध्यक्ष दूर्योधन पुसाम ,सचिव मोहन सयाम ,शोभिलाल सयाम,व महिला भगीनी हजर होत्या यावेळी अध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी ४५ मिनिट भाषणात शिका,संघर्षरत रहा,व उलगुलान खरा व बिरसा मुंडा ,बाबासाहेब आंबेडकर तसेच त्यांचे सारखे कर्तॄतवान होवून लढा यशस्वी करा असा चौफेर संवाद करून बोधामॄर्त पाजले...

महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळ आगार तिरोडा येथे बिरसा फायटर्सच्या समितीच्या वतीने १४८ महामानव धरती आबा बिरसा मुंडा जयंतीवर कर्मचारी व महिला मंचाचा अभिवादन

Image
तिरोडा:(15 ) आज राज्य परिवहन महामंडळ तिरोडा  शाखा बिरसा फायटर्स व महिला महिला मंचातर्फे धरती आबा महामानव भगवान बिरसा मुंडा 148 व्या जयंती चे उत्सव  थाटात संपन्न त्यावेळी आगार प्रमुख दांडगे महिला विदर्भ अध्यक्षा छाया दिलीपकुमार मडावी,प्रा डिबि खंडाते,दिलीपकुमार मडावी रामकिशोर वरखडे टेकाम,व अनिल शिडाम यांचे प्रमुख हजेरीत गुणवंताचा सत्कार करून स्वागत व समाजप्रबोधन कार्यक्रम पार पाडला

आदिवासी संघटणांचा विरोधाला न जूमानता केंद्रीय सांस्कॄतिक मंञालय प्रायोजित खासदार पुरस्कॄत आदिवासी महोत्सव मंगलमुर्ती सभागॄहात साजरा

Image
साकोली :- ( २०)एकीकडे मनीपुर राज्यासह संपुर्ण राज्यात जसे एमपीत अंगावर पेशाब करने,महिलांना वस्त्रहिन करून नग्न ढिंड काढणे,अशा अन्नवित अन्याय, अत्याचारांच्या घटना होत असताना दुसरीकडे केंद्रीय सांस्कॄतिक मंत्रालय भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात खासदार पुरस्कॄत आदिवासी महोत्सवाचे आयोजन केले जाते.वआदिवासी बांधवाच्या गोंडी नॄत्याचे नाव देवून छत्तीसगढी ( हमरा पारा तुमरा पारा) गीत दाखवत,बोली भाषा वेषभुषा ,समाज बांधवाच्या अस्मिता,व परंपरेला काळींबा फासत आहे, सरकार आदिवासीच्या सुख दुखा शी घेने देने नाही म्हणुन सर्व आदिवासी संघटणा एकञ येवून मा पोलिस अधिक्षक गोंदिया भंडारा यांना निवेदन देवून व शोसल मिडियावर तिव्र विरोधाला न जुमानता जखमेवर मीठ चोळण्याचे  काम करीत आहेत.विरोध दर्शविला असतानी नॄत्य सुरू करून आदिवासी पुढार्यां ना भेटतात व माशी मला त्याचे काहीच माहिती नाही अशा अविर्भावात उत्तरे देतात.हे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले.असो.केंद्र व राज्यात एका पक्षाची सरकार असताना आरोपींना शोधण्याकरिता ७७ मोठा दिवसाचा अवकाश लागतो तर सुप्रिम कोर्ट केंद्र सरकार व राज्य सरकार नपुषक असल्याचे...

वासडी ( देवरी) येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

Image
जागतिक आदिवासी दिनाचे अौचित्य साधून वासडी ( देवरी येथे मूलनिवासी दिन साजरा करण्यात आले.त्यावे ळी बिरसा फायटर्स,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व अन्य संघणाचे पदाधिकारी हजर होते याप्रसंगी गोंद़िया जिल्हा माजी डेयुटी सिईअो,राजकुमार  पुराम साहेब यांनी समाजप्रबोधन केले तेव्हा बाबुराव हीडको, ,सरपंच मडावी,मळकाम,वसंताजी हजर होते...

विविध कार्य सेवा सहकारी संस्था मर्यादित वडेगांव येथे बिरसा फायटर्स सभासद व संस्था सदस्य वामनजी वाढवे यांचे शुभहस्ते *आझादी का अमॄर्त महोत्सव का* ७७ वा ध्वजरोहन संपन्न.

Image
साकोली (१५ ) स्वातंञ्याचा अमॄर्त महोत्सव ७७ वी वर्ष गाठ सोहळा विविध सेवा सहकारी संस्था मर्यादित वडेगांव येथे संपन्न यावेळी संस्थेचे ध्वजारोहन बिरसा फायटर्स जेष्ठनेते समाजसेवक व संचालक वामनजी वाडवे यांचे हस्ते पार पडले प्रसंगी सेवा संस्थाघे अध्यक्ष गिरिधारी रहांगडाले,उपाध्यक्ष नरेंद्र कापगते पी टी राऊत मा पं सं सदस्य,व सर्व विविध संस्था संघटणांचे प्रतिनिधी हजर होते यावेळी जिल्हा परिषद शाळेत,शैलेष कापघते, स्व,नि वाघाये कनिठ म हा वि द्या ल य वडेंगां‌व एच एम आनंद रहांगडाले,धनपाल राऊत,ग्रांप येथे सरपंच माधूरी गहाने,उपसरपंच डी एम राऊत संजय कापगते,विश्रांती भानारकर,सुनिल राऊत,दिपा राऊत ग्राप सदस्या हजर होते तर शंकरपुर येथे बिरसा फायटर्सचे वतीने सप्तरंगी फडकविले व राष्ट्रध्रंवज लता टेकाम सदस्याचे शुभ हस्ते  ध्जावरोहन करण्यात आले यावेळी गावातून शाळेकरी मुले मुलीचे रँलीचे आयोजन करण्यात आले व जयघोष आदि नारे दिले.  

तिरोडा डाँ बाबासाहेब आँबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे *आझादी के ७७ वे अमॄर्त महोत्सव* पर बिरसा फायटर्स संघटणांचे प्रतिनिधीचे उपस्थीत ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न.

Image
तिरोडा (१५ आँगष्ट) भारत वर्षात स्वातंत्र्याचा ७७ वा अमॄर्त महोत्सव साजरा करीत असून डाँ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येधे संस्थेचे अध्यक्ष/ सचिव सुरेश बंसोड,यांचे हस्ते व ध्वजारोहन पार पडले तेव्हा सुरेशकुमार पंधरे,राष्ट्रीय उपाध्यक्ष बिरसा फायटर्स, सुधीर मेश्राम सर,देवेंद्र खंडाते, सर,व समितीचे विविध पुरूष व महिला पदाधिकारी अगत्याने हजर होत्या.